तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मान्यता देणेबाबत...

तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मान्यता देणेबाबत...

    
  शासन निर्णय gr दि १३ मार्च २०२६ नुसार..........
             राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास साधण्यासाठी शासनाने बीज भांडवल योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत तृतीयपंथीय लाभार्थ्यांना लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज, शासन अनुदान आणि आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. या माध्यमातून तृतीयपंथीयांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

०२. बीज भांडवल योजनेचे स्वरुप :-

1) महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्ष वास्तव्य असलेल्या तृतीयपंथीय या घटकातील व्यक्तींना त्यांचेकडे असलेले कौशल्य व अप्रशिक्षीत व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांमार्फत छोट्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविण्यात येईल.

II) प्रस्तुत योजनेतंर्गत अप्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना प्रामुख्याने खालील व यासारखे इतर लघु व्यवसायांसाठी बीजभांडवल योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.

II) प्रशिक्षीत असल्यास तृतीयपंथीय लाभार्थ्यांना खालील व यासारख्या इतर व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे तसेच अप्रशिक्षीत तृतीयपंथीय व्यक्तींना व्यवसायाचे प्रशिक्षण विभागांमार्फत देऊन त्याकरीता आवश्यक साधने संच (Tool Kit) साठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.



०३. कर्जाचे प्रकार :-

प्रस्तुत योजनेतंर्गत तृतीयपंथी लाभार्थ्यास खालीलपैकी कोणतेही एक कर्ज अनुज्ञेय राहील.

१. लघु कर्ज योजना रुपये २५,०००/- पर्यंत लाभार्थी हिस्सा ५ टक्के, ४५ टक्के शासन अनुदान व ५० टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज)

२. मध्यम कर्ज योजना रुपये ५०,०००/- पर्यंत (लाभार्थी हिस्सा ५ टक्के, ४५ टक्के शासन

अनुदान व ५० टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज)

३. दीर्घ कर्ज योजना रुपये २,००,०००/- पर्यंत लाभार्थी हिस्सा ५ टक्के, ४५ टक्के शासन अनुदान व ५० टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज)


०४. बीज भांडवल योजनेची वैशिष्टे :-

१. राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे. २. व्यक्तींना लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन देणे.

३. सदरची योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविली जाईल.

४. सदर योजनेअंतर्गत तृतीयपंथीय लाभार्थ्यांसाठी कौशल्य / व्यवसाय विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल.

५. सदर योजनेंतर्गत लाभार्थी हिस्सा ५ टक्के, ४५ टक्के शासन अनुदान व ५० टक्के

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज, ह्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येईल. (सदर योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या कर्जावरील व्याज दर (Rate of Interest) संबंधित बँकेच्या अंतर्गत नियमन व रिझर्व्ह बँक (RBI) कडून निश्चित केलेल्या धोरणांप्रमाणे राहील.)

६. सदर योजनेंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या लाभार्थ्यास व्याजावर ३ टक्के रिबेट(सुट) देण्यात येईल.


०५. बीज भांडवल योजनेसाठी लाभार्थ्यांचे पात्रता निकष :-

१. लाभार्थी हा तृतीयपंथी व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी किमान १० वर्षे असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

२. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.

३. लाभार्थी हा १८ ते ५० या वयोगटातील व्यवसाय करण्यासाठी सक्षम असावा.

४. बीज भांडवल योजनेंतर्गत कर्जदारास कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची गरज नाही.

५. कोणत्याही प्रकारचे तारण (मॉर्गेज) ठेवावे लागणार नाही.

६. लाभार्थ्यांने अर्ज करतेवेळी यापूर्वी इतर कोणत्याही बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

७. तृतीयपंथीय लाभार्थ्याने व्यवसायासाठी कौशल्य असल्यास नमूद करणे आवश्यक आहे.


०६. बीज भांडवल योजनेंतर्गत कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

१. महाराष्ट्र राज्यात किमान १० वर्षे वास्तव्य केले असल्याचे अधिवास प्रमाणपत्र-

२. सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले ओळखपत्र.

३. वास्तवाकरिता पुरावा मतदान ओळखपत्र / आधार कार्ड / पॅनकार्ड/ रेशनकार्ड/लाईट बील/ घराची टॅक्स पावती/भाडे करारपत्र इत्यादी

४. लाभार्थी जो व्यवसाय करणार आहे किंवा करत असल्यास त्याचा परवाना व स्थायी पत्ता. ५. व्यवसायासाठी लागणारी सामुग्री किंवा यंत्र सामुग्री इत्यादीचे कोटेशन व बिले.

६. व्यवसाय ज्या ठिकाणी करणार आहे त्या जागेचा ७/१२ उतारा / प्रकल्पासाठी जागा भाडे

तत्वावर घेणार असल्यास भाडेकरारनामा. (परिशिष्ट-ब)

७. व्यवसायाच्या जागेचे ठिकाण भाडेकराराने असल्यास जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.

८. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र.

९. लाभार्थ्याने ज्या प्रयोजनासाठी कर्ज घेतले आहे, त्याच प्रयोजनासाठी उपयोग करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.

१०. अर्जदाराचे २ फोटो.


०७. बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दती :-

तृतीयपंथीय लाभार्थ्यांने शासनाने विहीत केलेल्या नमुन्यामधील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडल्याची पुर्ण खात्री करुन परिपुर्ण अर्ज सक्षम प्राधिकारी व संबंधीत जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक राहील. (विहीत नमुन्यातील अर्ज- परिशिष्ट-अ)


०८. बीजभांडवल योजनेची कार्यपध्दती:-

तृतीयपंथीय लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजूर करण्याबाबत शासनामार्फत सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सक्षम प्राधिकारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेमार्फत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनंतर कर्ज मंजूरीबाबत बँकेस शिफारस करण्यात येईल. सदर कर्ज मंजूरी नंतर शासन अनुदानासाठी संबंधित जिल्हाचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या • शिफारशीनुसार आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्यामार्फत शासनास सादर करावेत.



०९. बीज भांडवल कर्जाची परतफेड :-

तृतीयपंथीय लाभार्थ्यांना बीज भांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांकडून उपलब्ध करुन दिलेले कर्जाचे हप्ते नियमानुसार विहीत मुदतीत भरणे बंधनकारक राहील.


१०. बीज भांडवल योजनेंतर्गत कर्जाची वसूली :-

तृतीयपंथीयांना बीज भांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जदारास दिलेल्या कर्जाची वसूली बँकेच्या नियमानुसार करावी. याबाबत कर्ज वसूलीस शासन कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.

११. प्रस्तुत योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने तृतीयपंथी लाभार्थ्यांकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत घेण्यासाठी सविस्तर प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात येईल.महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आर्थिक भारासह NSOF aligned असलेले Short Term Training अभ्यासक्रम राबविण्याचा प्रस्ताव तयार करून तो सामाजिक न्याय विभागास सादर करतील.

१२. तृतीयपंथी घटकातील व्यक्तींना वरील मुद्दा क्र.०२(ड) मधील योजनांचा बीज भांडवल योजनव्दारे लाभ देताना कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता विकास प्रशिक्षण देणे अनिवार्य राहील.

१३. व्यवसायाची देण्यात आलेली यादी ही केवळ दिशादर्शक असून आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या शिफारशीनुसार लाभार्थ्यांच्या यादीत वाढ / घट करण्याचा अधिकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास राहील.

१४. कौशल्य विकास प्रशिक्षण करीता बीज भांडवल (Seed Capital) योजनेतंर्गत तृतीयपंथीया॑च्या सामाजिक पर्याय (Community Option) सहकारी संस्था (Cooperative Society) किंवा कार्यगट (Working Groups जसे स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन करण्यात आल्यास त्यांनाही सदर योजनेचा एकत्रित लाभ देता येईल.

सदर योजनेतंर्गत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी खालील राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे.



वरील सर्व समित्यांमध्ये आवश्यकतेनुसार संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित सदस्य म्हणून आमंत्रित करता येईल.

१८. बीज भांडवल योजनेंतर्गत प्रति जिल्हा लाभार्थी संख्या २५ इतका लक्षांक निश्चित करण्यात येत असून सदर लक्षांक हा जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या संख्येनुसार निश्चित करण्यात यावा. सद्य:स्थितीत सदर योजनेसाठी पहिल्या टप्प्यात लाभार्थी संख्या साधारणपणे १००० प्रतिवर्षी इतकी निश्चित करण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांच्या यादीत वाढ / घट करण्याचा अधिकार आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या शिफारशीनुसार शासनास राहील.

१९. सदर योजनेच्या माहितीसाठी समाजकल्याण आयुक्तालय, पुणे येथे मदत कक्ष (Help Desk) स्थापन करण्यात येईल.

२०. सदर बीज भांडवल योजनेतंर्गत पोर्टल, प्रशिक्षण, जाहिरात, प्रचार व प्रसिध्दी तसेच इतर प्रशासकीय खर्चासाठी अर्थसंकल्पित निधीच्या ५ टक्के निधीची तरतूद करण्यात येत आहे.

२१. सदर योजनेकरिता मागणी क्रमांक एन-३. मुख्य लेखाशीर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण (०२) तृतीयपंथीयांचे कल्याण, (०२) (०१) तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तृतीयपंथीया॑च्या कल्याण मंडळाची स्थापना ( कार्यक्रम) (२२३५ सी १९९) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली मंजूर अनुदानातुन भागविण्यात येईल.

बीज भांडवल योजनेचे महत्व / फायदे

  1. तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात.

  2. त्यांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास होण्यास मदत होते.

  3. व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन अनुदान व बँक कर्ज मिळते.

  4. कौशल्य नसलेल्या व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.

  5. तृतीयपंथीयांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्यास मदत होते.

  6. समाजात त्यांचा सन्मान व सहभाग वाढतो.

  7. लघुउद्योग व छोटे व्यवसाय सुरू करून स्थिर उत्पन्न मिळण्याची संधी मिळते.


              तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य, कर्ज सुविधा व कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याचा उद्देश आहे.


राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विस्तार बाबत


जिल्हा परिषदेच्या अधिनस्त मोडकळीस आलेल्या / धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारती निर्लेखनाबाबत मार्गदर्शक नवीन सूचना.


राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणेबाबत व शाळा व्यवस्थापन, कर्मचारी तसेच विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित करणेसाठी कार्यपध्दती.


केंद्रीय प्राथमिक शाळा — - केंद्र – केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेबाबत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.