प्रतिवर्षी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

प्रतिवर्षी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.





शासन निर्णय दि १७ मार्च २०२६ नुसार शासनाने निर्देश दिले आहेत कि...........

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार केवळ राज्यापुरता सिमित न राहता त्याच्या कक्षा राज्याबाहेर व परदेशात रुंदावण्यासाठी प्रतिवर्षी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.


२. विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी:-

विभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्य मराठी विकास संस्था, मुंबई या संस्थेच्या स्थापनेमागे विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावा आणि मराठी भाषेच्या अभिवृध्दीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी हे मुख्य उद्दिष्ट आहे.

मराठी भाषेसंदर्भात भारतात आणि भारताबाहेर कार्य करणे हे राज्य मराठी विकास संस्थेचे मुख्य कार्य असून, राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ३ मधील उद्दिष्ट क्र. १३ मध्ये “अन्य राज्यातील आणि परदेशातील मराठी भाषिकांसाठी विविध भाषिक उपक्रम राबविणे, या बाबीचा उल्लेख आहे.सदर बाबींचा विचार करता, “प्रतिवर्षी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी राज्य मराठी विकास संस्थेवर सोपविण्यात येत आहे.


राज्य मराठी विकास संस्थेकडून विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यासंदर्भात पुढील अटी व शर्ती निश्चित करण्यात येत आहेत-

१) विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनाच्या अनुषंगाने कामांची रुपरेषा तयार करून,

नियोजन करुन विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम/ उपक्रम राबविताना मराठी भाषेचे जतन व संवर्धन, प्रचार व प्रसिद्धी तसेच, मराठी भाषेच्या विकासाबाबतच्या मूळ धोरणाचा प्राधान्याने विचार करण्यात यावा आणि त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याची राज्य मराठी विकास संस्थेने दक्षता घ्यावी.

२) विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनासाठी खर्च करताना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक ०१.१२.२०१६ व दिनांक ०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या खरेदीबाबतच्या कार्यपद्धतीचा व यानुषंगाने वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय/आदेश यांद्वारे विहित करण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

३) विश्व मराठी संमेलनाच्या जाहिरात प्रसिद्धीविषयक कामांसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय/ आदेशान्वये विहित करण्यात आलेली कार्यपद्धती अनुसरण्यात यावी.

४) प्रतिवर्षी आयोजित करावयाच्या विश्व मराठी संमेलनामधील प्रस्तावित कामांसाठी दर / निवड करावयाच्या संस्था याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय तसेच, ई-निविदा मागविण्याबाबतच्या सर्वसाधारण निदेशांचे व अनुदेशांचे पालन राज्य मराठी विकास संस्थेने करावे.

५) विश्व मराठी संमेलनाच्या संदर्भातील कामे करताना, राज्य मराठी विकास संस्थेच्या कोणत्याही उपक्रमासंदर्भात जी प्रचलित कार्यपध्दती राबविण्यात येते ती सर्व कार्यवाही राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर पूर्ण करुन प्रतिवर्षी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करावे.

६) विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करताना राज्य मराठी विकास संस्थेने नविन तंत्रज्ञान AI चा वापर करावा, जेणेकरुन सुयोग्य नियोजन करुन उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर होऊन, अनावश्यक खर्च टाळता येईल.

७) प्रतिवर्षी विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनाची कार्यवाही पार पाडल्यानंतर संमेलनाच्या फलनिष्पत्तीबाबतचा अहवाल राज्य मराठी विकास संस्थेने शासनास सादर करावा.



प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या विश्व मराठी संमेलनासाठी आमंत्रित करावयाचे मान्यवर / संख्या :-

अ) परदेशातील मराठी भाषिक संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळे, मागील वर्षी संमेलनास उपस्थित असलेले परदेशस्थ तसेच आंतराष्ट्रीय मंच समन्वयक यांच्यामार्फत विविध देशातील मराठी भाषिकांना आमंत्रण देण्यात येईल.

ख) महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यातील मराठी भाषिक बृहन्महाराष्ट्र मंडळे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांचेमार्फत विविध राज्यातील मराठी भाषिकांना/ संस्थांना आमंत्रण देण्यात येईल.

महाराष्ट्रातील साहित्यिक, लेखक, मराठी भाषेतील तज्ज्ञ व्यक्ती, मराठीसाठी काम करणान्या व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थस यांचेमार्फत आमंत्रण देण्यात येईल.

प्रतिवर्षी आयोजित होणाऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये "विश्व मराठी साहित्य भूषण पुरस्कार" आणि "विश्व मराठी कलारत्न पुरस्कार पुरस्कार असे दोन पुरस्कार देण्यात येतील.

५.१ "विश्व मराठी साहित्य भूषण पुरस्कार": ज्यांचे मराठीतील साहित्य इतर भाषांत तसेच, जागतिक स्तरावर पोहोचलेले आहे अशा प्रतिभावान व्यक्तीस "विश्व मराठी साहित्य भूषण पुरस्कार देण्यात येईल.

५.२ विश्व मराठी कलारत्न पुरस्कार - साहित्य वगळून मानवी जीवनाशी संबंधित इतर कला, विविध कौशल्ये, मानवी जीवनाची मूल्ये यांमध्ये राज्यात / राज्याबाहेर/ परदेशात अतुलनीय कामगिरी केलेल्या मराठी माणसाला “विश्व मराठी कलारत्न पुरस्काराने" सन्मानित करण्यात येईल.

५.३ विश्व मराठी संमेलनात देण्यात येणाऱ्या "विश्व मराठी साहित्य भूषण पुरस्कार" या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. १०.०० लक्ष, मानचिन्ह आणि मानपत्र असे असेल.

तसेच, “विश्व मराठी कलारत्न पुरस्कार" या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम रु. ५.०० लक्ष, मानचिन्ह आणि मानपत्र असे असेल.


6. "विश्व मराठी साहित्य भूषण पुरस्कार" व "विश्व मराठी कलारत्न पुरस्कार या पुरस्कारांच्या अनुषंगाने कार्यवाही :-

प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या विश्व मराठी संमेलनात देण्यात येणारे "विश्व मराठी साहित्य भूषण पुरस्कार" व "विश्व मराठी कलारत्न पुरस्कार" हे दोन्ही पुरस्कार देणेबाबतची कार्यपद्धती, निवडीचे निकष व अनुषंगिक सर्व बाबी राज्य मराठी विकास संस्थेने संस्थेच्या नियामक मंडळाच्या व कार्यकारी समितीच्या मान्यतेने निश्चित कराव्यात.

तसेच, राज्य मराठी विकास संस्थेने सदर दोन्ही पुरस्कारांसाठीच्या पात्र पुरस्कारार्थीची निवड करावी व प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये सदर दोन्ही पुरस्कार देणेबाबतची कार्यवाही करावी.

७. विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनासाठी व पुरस्कारांसाठी होणारा खर्च राज्य मराठी विकास संस्थेच्या "मागणी क्र. झेडएफ-२ २२०५, कला व संस्कृती, (००) १०२ कला व संस्कृती प्रचालन, (०२) कार्यक्रम, (०२) (०१) राज्य मराठी विकास संस्था (कार्यक्रम), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२०५ ३२०५०) या लेखाशीर्षाांतर्गत संबंधित आर्थिक वर्षात मंजूर अनुदानातून रक्कम रु. १५.०० कोटीच्या मर्यादेत करण्यात यावा.

८. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.४७/१४४३. दि.१६.०२.२०२६ आणि वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. १९०/व्यय-४, दि.११.०३.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.


सारांश

             शासन निर्णयानुसार, मराठी भाषेचा प्रचार व प्रसार राज्यापुरता मर्यादित न राहता देश-विदेशात वाढविण्यासाठी दरवर्षी “विश्व मराठी संमेलन” आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

           या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट मराठी भाषेचा दर्जा उंचावणे, तिचा वापर वाढवणे आणि मराठी भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणे हे आहे.

           संमेलनाचे आयोजन करताना मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार आणि जागतिक स्तरावर प्रसार याला प्राधान्य दिले जाईल. तसेच, कार्यक्रमांचे नियोजन, खर्च, जाहिरात, निविदा प्रक्रिया इत्यादी सर्व कामे शासनाच्या नियमांनुसार पार पाडली जातील.

संमेलनामध्ये देश-विदेशातील मराठी भाषिक, साहित्यिक, कलाकार व तज्ज्ञांना आमंत्रित केले जाईल. यामध्ये “विश्व मराठी साहित्य भूषण”“विश्व मराठी कलारत्न” हे पुरस्कार देऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाईल.

महत्व / फायदे

  1. मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार होतो.

  2. देश-विदेशातील मराठी भाषिकांमध्ये एकात्मता वाढते.

  3. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचे जतन व संवर्धन होते.

  4. साहित्यिक व कलाकारांना प्रोत्साहन व सन्मान मिळतो.

  5. मराठी भाषेचा विकास आणि वापर वाढतो.

  6. नव्या पिढीत मराठीबद्दल आवड व अभिमान निर्माण होतो.


राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांत वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीत अनुसरावयाच्या कार्यपध्दीतीबाबत.


एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत......


शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत


राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.