शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत,Regarding health check-ups of school students

शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत

शासन निर्णय दि २९ एप्रिल २०२५ नुसार.......

१) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करिता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता खालील प्रमाणे कार्यवाही आवश्यक आहे..

१) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वनविण्यात आलेल्या ऑनलाईन अॅपचा (हेल्थ अॅप) वापर करून आरोग्य तपासणी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी.

२) ऑनलाईन अॅपमध्ये माहिती अद्ययावत करून शालेय विद्यार्थ्याची वैयक्तीक आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड) तयार करणे व विभागाव्दारे सुरू

संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे.

आरोग्य तपासणीअंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK)योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्यावावत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.

३. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्यावावत योग्य काळजी घेण्यात यावी.

४. सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड बनविण्यात यावे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप मध्ये upload करण्यात येत असल्यावावत खातरजमा करावी.

५. कार्यक्रमाशी संबंधित अडचणी, त्रुटी आंतर विभागीय समन्वयाने सोडविणे.

प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समितीचा आढावा घेणे, मार्गदर्शन करणे...

ब) राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालीका सहीत सर्व महानगरपालीका, नगरपालीकामधील शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी संबंधित महानगरपालीका व नगरपालीका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम प्रभावीपणे अंबलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी. यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणअधिकारी, प्रशासन अधिकारी यांची राहील.

१. शाळांमधील विदयार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे व वेळा पत्रकानुसार आरोग्य तपासण्यांचे सनियंत्रण करणे.

२. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीअंती काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, त्यावावत आवश्यक नियोजन करण्यात यावे. व त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे.

आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्यावावत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.

३. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्यावावत योग्य काळजी घेण्यात यावी.

४. सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड बनविण्यात यावे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप मध्ये upload करण्यात येत असल्यावावत खातरजमा करावी.

क) उपरोक्त अ येथे नमूद ९ जिल्हे वगळून उर्वरित जिल्ह्यामध्ये जिल्हा व तालुकास्तरावर पुढीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे.

जिल्हास्तर समितीची रचना

सदर समितीची बैठक दोन महिन्यातून एकदा होईल.

जिल्हास्तर समितीची कार्ये-

१.जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळांमधील विदयार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे व वेळापत्रकानुसार आरोग्य तपासण्यांचे सनियंत्रण करणे.

२. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीअंती काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, त्यावावत आवश्यक नियोजन करण्यात यावे. व त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे.

आरोग्य तपासणीअंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्यावावत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.

३. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्यावावत योग्य काळजी घेण्यात यावी.

४. सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड बनविण्यात यावे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप मध्ये upload करण्यात येत असल्यावावत खातरजमा करावी.

५. कार्यक्रमाशी संबंधित अडचणी, त्रुटी आंतर विभागीय समन्वयाने सोडविणे.

६. प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समितीचा आढावा घेणे, मार्गदर्शन करणे..

सदर समितीची बैठक दरमहा होईल.

तालुकास्तरीय समितीची कार्ये :-

१. तालुक्यातील शाळांमधील विदयार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे व वेळापत्रकानुसार आरोग्य तपासण्यांचे सनियंत्रण करणे.

२. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीअंती काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, त्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे. व त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.

संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे.

आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK)

योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्यावावत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.

३. विद्यार्थ्यांची आरोग्य तपाणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्यावावत योग्य काळजी घेण्यात यावी.

४. सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड बनविण्यात यावे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप

मध्ये upload करण्यात येत असल्यावावत खातरजमा करावी.

५. कार्यक्रमाशी संबंधित अडचणी, त्रुटी आंतर विभागीय समन्वयाने सोडविणे.

६. प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुक्यातील शाळांचा आढावा घेणे, मार्गदर्शन करणे....

३. मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या :-

१. संबंधित मुख्याध्यापक यांनी पालकांना सूचना देवून आरोग्य तपासणीच्या वेळी उपस्थित राहण्यावावत कळविण्यात यावे.

२. आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) वैद्यकिय पथकाव्दारे सुरक्षित व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य तपासण्या करण्यात येत असल्याची दक्षता घेण्यात यावी.

३. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्याच्या व्याधीबाबत योग्य उपचार करण्यासाठी तसेच उपचार सुरू असल्याबाबत नोंदी ठेवाव्यात व ट्रॅकिंग सिस्टीम तयार झाल्यानंतर त्याचा वापर करून ऑनलाईन नोंदी ठेवाव्यात.

४. शालेय आरोग्य तपासणीच्या वेळी शाळेतील सर्व १०० टकके विद्यार्थी उपस्थित राहतील यावावत संबंधित शाळेने नियोजन करावे व सर्वच विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करून घेण्यात यावी.

५. शालेय आरोग्य तपासणी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी तालुका अथवा जिल्हा रूग्णालयात नेण्याची आवश्यकता असले तर त्यावावत तालुका व जिल्हास्तरावर नियोजन करण्यात यावे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.