शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा - (SQAAF) बाह्य-मूल्यांकन करण्यासाठी पथके तयार करणेबाबत.....

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा - (SQAAF) बाह्य-मूल्यांकन करण्यासाठी पथके तयार करणेबाबत.....


उपरोक्त संदर्भ क्र. ०१ च्या शासन निर्णयान्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. संदर्भ क्र. ०२ च्या शासन निर्णयान्वये शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (SQAAF) तयार करण्यात आला आहे. संदर्भ क्र. ०२ ला अनुसरून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या (शासकीय, खाजगी अनुदानित व खाजगी विनाअनुदानित किंवा स्वयं अर्थसहाय्यीत), सर्व माध्यमाच्या शाळांचे स्वयं मूल्यांकन (१००% शाळा), बाह्य मूल्यांकन (स्वयं-मूल्यांकनातील १००% शाळांपैकी एकूण ५% शाळा) व त्रयस्थ पक्षाकडून मूल्यांकन ( ५% शाळांच्यापैकी ४०% शाळा ) करण्यात येणार आहे. त्यासाठी संदर्भ क्र. ०३ ते ०६ नुसार वेळोवेळी स्वयं-मूल्यांकनासाठी मुदतवाढ देण्यात आली होती व दिनांक: ३०.०६.२०२५ पासून स्वयं-मूल्यांकनाची लिंक बंद करण्यात आली आहे. स्वयं-मूल्यांकनाचा टप्पा पूर्ण केल्याने त्यानंतर बाह्य-मूल्यांकनाचा टप्पा सुरु करून पूर्णत्वास आणणे अपेक्षित आहे.

करिता, शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये स्वयं मूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन हे १५ जुलै, २०२५ ते ३१ जुलै, २०२५ च्या दरम्यान करून घेण्यासाठी सोबत दिलेल्या सुचनापत्राप्रमाणे शाळांचे बाह्य-मूल्यांकन करून घेण्यासाठी तालुकानिहाय पथकांची नियोजित संख्या देण्यात आली आहे (सोबत स्वतंत्र PDF देण्यात आली आहे). त्यानुसार शिक्षणाधिकारी (प्राथ.माध्य.), जि. प. (सर्व) यांनी पथके तयार करण्यात यावीत व तयार केलेल्या पथकांमधील पथक प्रमुख यांची माहिती (जिल्ह्याची एकत्रित) Excel file मध्ये (इंग्रजीतील Font - Times New Roman, Font Size – १२) खालील नमुन्यात दिनांक: ०७.०७.२०२५ पर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. (सर्व) यांनी राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाच्या sqaafmh@maa.ac.in या ई-मेल आयडीवर सादर करावी. पथक प्रमुख यांना लॉगीन उपलब्ध करून दिले जाणार असल्याने एकदा पथक प्रमुख म्हणून निवड केल्यानंतर पथक प्रमुख व त्यांचा इमेल आयडी बदलला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी (दिलेल्या माहितीत कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही).

सदरील नियोजनात प्रत्येक पथकाने एका दिवसात ०१ शाळेचे बाह्य मूल्यांकन करावयाचे आहे. बाह्य-मूल्यांकन प्रक्रिया ही ० ६ दिवसात करावयाची असल्याने प्रत्येक पथक किमान ०६ शाळांचे बाह्य मूल्यांकन करेल असे नियोजन करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर खाली दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील SQAAF मूल्यांकनाची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथ., माध्य.) यांची राहील.

मूल्यांकनासाठी निश्चित केलेला कालावधी अंतिम दिनांक: ३० जून, २०२५

अंतिम दिनांक: ३१ जुलै, २०२५

तसेच, पथकातील सदस्याची निवड व संख्या खाली दिलेल्या निकषानुसार करावी. पथकातील सदस्याची निवडीसाठीचे निकष, संख्या व सूचना खालीलप्रमाणे आहेत-

१. प्रत्येक पथकामध्ये एकूण किमान चार (०४) सदस्य संख्या असावी.

२. पथकाचा एक सदस्य पथकप्रमुख असतील व पथकात इतर तीन सदस्य राहतील.

३. गटशिक्षणाधिकारी / अधिव्याख्याता (DIET ) / विस्तार अधिकारी (शिक्षण) / केंद्रप्रमुख किंवा यांचेपेक्षा वरिष्ठ अशी व्यक्ती पथकप्रमुख

असतील.

४. सदस्य क्र. ०१ मुख्याध्यापक (प्राथ.) किंवा खालील मुद्दा क्र. ०७ प्रमाणे असतील.

५. सदस्य क्र. ०२ मुख्याध्यापक (माध्य.) / उपमुख्याध्यापक/ पर्यवेक्षक असतील.

६. सदस्य क्र. ०३ हे क्षमतावृद्धी प्रशिक्षण जिल्हास्तरावर शिक्षक २.० मध्ये SQAAF विषयी मार्गदर्शन केलेले शिक्षक किंवा प्राथमिक/माध्यमिक शाळेतील वरिष्ठतम शिक्षक प्रतिनिधी असतील.

७. SQAAF निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या मुख्याध्यापक / शिक्षक / साधनव्यक्ती इ. तसेच आपल्या जिल्ह्यातील राज्यस्तरीय/ जिल्हास्तरीय मार्गदर्शक समितीतील सदस्याची निवड सदस्य क्र. ०१ म्हणून अग्रक्रमाने होईल याची दक्षता घ्यावी (राज्यस्तरीय मार्गदर्शक समितीतील सदस्याची यादी सोबत देण्यात आली आहे).

८. बाह्य-मूल्यांकनाची प्रक्रिया सुकर व्हावी यासाठी पथकप्रमुख यांनी पथकातील सदस्यांना पुढीलप्रमाणे कामकाज करणेबाबत सूचित करावे -

वर दिलेल्या कामकाज वाटपाच्या नियोजनात अंशतः बदल करण्याचे अधिकार पथकप्रमुख यांना राहतील. ९. पथकप्रमुख व सदस्य यांनी शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४ / प्र. क्र. ०९ / एसडी - ६ मंत्रालय, मुंबई दि. मार्च २०२४, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मधील प्रकरण क्र. १ मधील १.३ मध्ये दिलेल्या सूचनेनुसार बाह्य मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करणेबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे. १०. आपल्या जिल्ह्यातील शाळांचे बाह्य-मूल्यांकन करण्यासाठी ज्या शाळांनी स्वयं-मूल्यांकन पूर्ण केलेले आहे अशाच शाळांची निवड करण्यात येणार आहे.

११. पथकातील सदस्यांनी SQAAF मार्गदर्शक पुस्तिकेचे वाचन व आवश्यक चर्चा शाळेच्या बाह्य मूल्यांकनास जाण्यापूर्वी करावी. तसेच, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांनी तयार केलेले SQAAF मार्गदर्शक व्हिडीओ पहावेत. त्याचबरोबर, वेळोवेळी

पाठवलेली पत्रे व परिपत्रकाचे बारकाईने वाचन करावे. SQAAF संदर्भातील सर्व संदर्भ, परिपत्रके व मार्गदर्शन व्हिडीओ हे maa.ac.in या संकेतस्थळावरील SQAAF या Sub Tab मध्ये आहेत त्याचे वाचन टीम मधील सर्व सदस्यांनी करावे.

१२. बाह्य मूल्यांकन करताना मानकासंबंधी शंका निर्माण झाल्यास राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीतील सदस्यांशी चर्चा करून स्तर निश्चिती करून गुणदान करण्यात यावे.

१३. पथकाची स्थापना, पथकप्रमुखाची व पथकातील सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांची राहील. पथकातील सदस्यांची निवड करण्यासाठी तसेच पथकातील सदस्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (माध्य.) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे सहकार्य घ्यावे. याउपरही काही शंका असतील तर SQAAF जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती सदस्य यांचेशी चर्चा करणेबाबत पथकप्रमुख यांना सूचीत करावे.

१४. आवश्यकतेनुसार पथकप्रमुख व सदस्यांची ONLINE किंवा OFFLINE बैठक जिल्हास्तरावरून आयोजित करून बाह्य-मूल्यांकनासंदर्भात सर्व सूचना देण्यात याव्यात.

१५. पथक प्रमुख यांनी बाह्य मूल्यांकनासाठी maa.ac.in या संकेतस्थळावर SQAAF SubTab मध्ये देण्यात आलेल्या बाह्य-मूल्यांकनासाठीच्या (https://scert data. web.app) या लिंकमध्ये मानकनिहाय आपला प्रतिसाद नोंदवावा.

१६. बाह्य-मूल्यांकनासाठी निश्चित केलेल्या शाळांची माहिती जिल्हास्तरावर उपलब्ध झाल्यावर लगेचच ती माहिती पथकप्रमुखांना उपलब्ध करून द्यावी.

१७. शाळा भेटीचे नियोजन करून पथकप्रमुखांना व बाह्य मूल्यांकनास निवडण्यात आलेल्या शाळांना किमान ०३ दिवस अगोदर कळविण्यात यावे.

१८. पथक प्रमुख यांनी आपला इमेल आयडी प्रविष्ठ करून प्रथम लिंकमध्ये लॉगीन करावे.

१९. त्यानंतर पथकाला बाह्य मूल्यांकनासाठी देण्यात आलेल्या सर्व शाळा दिसतील त्यातील आपण भेट दिलेल्या शाळेचा Udise Number प्रविष्ठ करावा.

२०. शाळेचा Udise Number प्रविष्ठ केल्यानंतर शाळेची माहिती व शाळेने स्वयं - मूल्यांकनात मानकनिहाय निवडलेला स्तर व दिलेली Google Drive ची लिंक दिसेल.

२१. Google Drive वरील पुरावे व भेटीच्यावेळी सादर केलेले पुरावे यानुसार प्रत्येक मानकाचा स्तर निश्चित करून मानकनिहाय स्तर लिंकमध्ये नोंदवावा व सर्वात शेवटी आपला प्रतिसाद पूर्ण करा या Tab चा वापर करून

आपला अहवाल अंतिम करावा. स्वयं-मूल्यांकनात नोंदविलेल्या सर्व मानकांचे बाह्य मूल्यांकन करणे बंधनकारक राहील.

२२. बाह्य-मूल्यांकनासाठी शाळेला भेट दिल्यानंतर पथक प्रमुखांनी आपल्या सदस्यांच्या समवेत भेट दिलेल्याचा फोटो व बाह्य-मूल्यांकनासाठीची लिंक SQAAF पोर्टलवर त्याच दिवशी उपलोड करणे बंधनकारक राहील. २३. पथक प्रमुखांनी मुख्याध्यापक यांच्यासमोर शाळेतच SQAAF पोर्टलवर (https://scert-data.web.app/ ) ऑनलाईन माहिती नोंदवणे आवश्यक आहे. गुणदान अंतिम केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. नोंदविलेला अहवाल त्याच रात्री १२.०० वाजता अद्ययावत होईल. अपूर्ण गुणदान केल्यास / गुणदान पूर्ण न केल्यास पथक प्रमुख जबाबदार राहतील.

२४. स्वयं-मूल्यांकन व पथकाने केलेले बाह्य-मूल्यांकन यामध्ये जर १५% पेक्षा जास्त फरक आला असेल तर पथक प्रमुखांनी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथ., माध्य.) यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

२५. तालुकानिहाय बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात येणाऱ्या शाळांची संख्या सोबत स्वतंत्र PDF फाईल मध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार तालुकानिहाय पथकांची स्थापना करण्यात यावी.

२६. जिल्हास्तरावर तालुकानिहाय पथकप्रमुख व पथकातील सदस्यांची माहिती खालीलप्रमाणे तयार असावी-




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.