राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत....independence-day

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी,२०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत....



शासनाने दि ३१ डिसेंबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून निर्देश दिले आहेत कि ...

भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आले आहे. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २. सदर दिवस हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या देशाची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने शाळांकडून प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रजासत्ताक दिनांकानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत दरवर्षी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येतात. सदर परिपत्रकातील सूचनांचे प्राथम्याने पालन करावे. सदर सूचनांच्या पालनासह दिनांक २६ जानेवारी, २०२५ पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी खालील उपक्रम राबवावेत. यासाठी प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा.


४) नृत्य स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी.

५) चित्रकला स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर विषयांवर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करावी.

६) निबंध स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्ती, स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयांवर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी.

७) खेळ : विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावेत.

८) प्रदर्शनी : विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, चित्रकला इत्यादींची प्रदर्शनी आयोजित करावी.

उपरोक्त कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करावा.

३. सदर परिपत्रकातील सूचनांप्रमाणे शाळांकडून प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल यासंदर्भात संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी काळजी घ्यावी.

४. वरील परिच्छेद क्र. २ मधील सुचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील याबाबतची दक्षता आयुक्त (शिक्षण), यांनी घ्यावी आणि त्याकरिता आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित कराव्यात.





26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 1 मे (महाराष्ट्र दिन) व 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या कार्यक्रमांमध्ये आणिबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत

राज्यात २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १ मे (महाराष्ट्र दिन) व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन)

या राष्ट्रीय सणांचे शासकीय कार्यक्रम ध्वजारोहण व ध्वजवंदन करुन साजरे केले जातात. २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन ) तसेच १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुंबई येथील मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी मा. राज्यपाल महोदय यांच्या हस्ते ध्वजवंदन व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी अनुक्रमे संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार ध्वजारोहण व ध्वजवंदन करतात. या कार्यक्रमांसाठी मा. लोकप्रतिनिधी व इतर मान्यवरांना निमंत्रित केले जाते. या मुख्य शासकीय समारंभाच्या आयोजनाबाबत शासन स्तरावरुन प्रतिवर्षी स्वतंत्ररित्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातात. या कार्यक्रमांमध्ये आणिबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन १९७५- ७७ च्या आणिबाणीच्या कालावधीमध्ये ज्या व्यक्तींना कारावास भोगावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान/ गौरव करण्याकरीता राज्यातील प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व स्वातंत्र्य दिन (जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय) या कार्यक्रमांस सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात

यावे.


राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणेबाबत व शाळा व्यवस्थापन, कर्मचारी तसेच विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित करणेसाठी कार्यपध्दती.


राज्यातील सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा बाबत


राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांत वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीत अनुसरावयाच्या कार्यपध्दीतीबाबत.


राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विस्तार बाबत


केंद्रीय प्राथमिक शाळा — - केंद्र – केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेबाबत.


राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.