शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये भरणे बाबत.
राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.३ नुसार सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी. सदरील ऑनलाईन लिंकवर माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. तसेच, सदरील लिंक ही दि.२८ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायं. ०५:०० पर्यत भरण्याची कार्यवाही करावी. सदरील लिंकमध्ये माहिती भरण्याची कार्यवाही खाली दिलेल्या सूचनानुसार विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी.
१. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मुल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची (SQAAF) प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची असेल.
२. संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयं-मुल्यांकन करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी
(माध्यमिक) यांची राहील.
३. शाळांना मुल्यांकनासंदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची असेल.
४. माहिती भरणे बाबत सर्व मुख्याध्यापक यांना सोबत दिलेल्या सूचना पत्राचे अवलोकन करून
माहिती भरणे बाबत कळविण्यात यावे.
५. SQAAF बाबत मार्गदर्शनपर व्हिडीओ SCERT, PUNE यांच्या SQAAF टॅबमधील SAAF व्हिडीओ या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. माहिती भरण्यापूर्वी सर्व मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहण्यासाठी सूचित करावे.
६. SQAAF बाबत शासन निर्णय SCERT, PUNE यांच्या SQAAF टॅबमधील SQAAF - शासन निर्णय या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. माहिती भरण्यापूर्वी सर्व शासन निर्णयार्थ अवलोकन करणेविषयी सूचित करावे.
७. मुल्यांकनासंदर्भात काही तक्रार असल्यास किंवा SQAAF लिंक भरणे बाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास sqaafmh@maa.ac.in या ई-मेल आयडीवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे मार्फत कळविण्यात यावे.
८. जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्वयं-मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बाह्य मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे. तरी सर्व शाळांना स्वयं मूल्यांकन करताना वस्तूस्थितीदर्शक माहिती भरणेबाबत कळविण्यात यावे. अवास्तव स्वयं-मूल्यांकन होणार नाही याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती/ शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांना घेणेविषयी कळविण्यात यावे.
९. स्वयं-मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य-मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे.
१०.स्वय-मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य मूल्यांकनात व त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मुल्यांकनात १५% हून अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकावर याबाबतची जबाबदारी निश्चित
करण्यात यावी.
११. बाह्य मुल्यांकनानंतर ज्या मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अशा मानकांचा विकास आराखडा तयार करणे शाळांना बंधनकारक राहील व SQAAF पोर्टलवर अपलोड करणेबाबत सूचना प्राप्त होताच अपलोड करणे बंधनकारक राहील.
१२. बाह्य मुल्यांकनानंतर / त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणारे मूल्यांकनानतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्यादर्शनी भागात व शाळेच्या लेटरहेडवर उल्लेख करावा.
महत्त्व
1. शाळांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन
- SQAAF मुळे सर्व शाळांची गुणवत्ता मोजण्याची एकसमान पद्धत तयार झाली आहे
- शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आधार मिळतो
2. राज्यस्तरीय एकसंध प्रणाली
- सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी एकच आराखडा लागू
- शिक्षण व्यवस्थेत एकरूपता येते
3. जबाबदारी निश्चित
- मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व DIET यांची स्पष्ट जबाबदारी ठरवली
- कामकाज अधिक प्रभावी होते
4. पारदर्शकता व उत्तरदायित्व
- स्वयं-मूल्यांकन + बाह्य मूल्यांकन
खरी स्थिती समोर येते
फायदे
1. शाळांचा सर्वांगीण विकास
- मूल्यांकनानंतर School Development Plan तयार करणे बंधनकारक
सुधारणा करण्यास मदत
2. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा
- कमतरता ओळखून त्यावर काम करता येते
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते
3. पारदर्शक व अचूक मूल्यांकन
- स्वयं + बाह्य + त्रयस्थ मूल्यांकन
चुकीची माहिती देण्यावर नियंत्रण
4. डिजिटल प्रक्रिया
- ऑनलाइन माहिती भरल्यामुळे
वेळ व कागदपत्रांची बचत
5. शाळांची रँकिंग/श्रेणी
- मूल्यांकनानंतर मिळालेली श्रेणी
शाळेची गुणवत्ता स्पष्ट दिसते
6. शिक्षक व व्यवस्थापन सुधारणा
- मुख्याध्यापक व शिक्षकांना
जबाबदारीची जाणीव व कामगिरी सुधारण्याची प्रेरणा
7. विद्यार्थ्यांना थेट फायदा
- चांगली सुविधा, शिक्षण पद्धती सुधारते
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढतो


मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .