महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2026 प्रसिद्धी निवेदन

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2026 प्रसिद्धी निवेदन



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दि २५ मार्च २०२६ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2026 प्रसिद्धी निवेदन

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) २०२६ परीक्षेचे रविवार दि. २१.०६.२०१६ रोजी आयोजन केले आहे.

इ. १ ली ते ५ वी (पेपर १) व इ. ६ वी ते इ. ८ वी (पेपर २) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दि. २७.०३.२०२६ पासून सुरु होत असून दि. १६.०४.२०२६ पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.




टिप :काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.

१. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा.

२. अर्ज भरताना परीक्षार्थीनी इ.१० वी, इ.१२ वी शैक्षणिक/ व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इ. बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी.

३. सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करुन ठेवावा. पेपर I (प्राथमिक स्तर) व पेपर II (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.

४. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बँकिंग, क्रेडिट / डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही.) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५.अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

६. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच, आवेदनपत्र / कागदपत्र (प्रमाणपत्रे) गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.

७. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

८. एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही.

९. शिक्षक पात्रता परीक्षा सन २०१९ व २०१८ या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे गु.र.नं. ५६/ २०२९ व ५८/ २०२१ अन्वये सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर, पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्हयाचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शास्ती निश्चित करून, या कार्यालयाचे आदेश दि. १४.१०.२०२२ अन्वये गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी / उमेदवार यांचे विरूध्द शास्ती निश्चित केलेली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या व या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सबब सन २०१९ व २०१८ गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही. तथापि सन २०१९ व २०१८ गैरप्रकाराच्या यादी मध्ये नाव समाविष्ठ असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची परीक्षार्थी / उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.

१०. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदे चे संकेतस्थळ तपासावे.

११. परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 –  महत्व :

१) शिक्षक होण्यासाठी अनिवार्य परीक्षा
इयत्ता १ ते ८ वी पर्यंत शिक्षक/शिक्षण सेवक होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

२) पात्रतेचा अधिकृत निकष निश्चित
शिक्षक भरतीमध्ये गुणवत्ता व पात्रता सुनिश्चित करण्यासाठी एकसमान निकष लागू होतो.

३) पारदर्शक भरती प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज व परीक्षा पद्धतीमुळे भ्रष्टाचार व गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवता येते.

४) डिजिटल प्रक्रिया सुलभ
अर्ज, शुल्क भरणा, माहिती अपडेट सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांना सोय होते.

५) विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्त्वाचे
पात्र व प्रशिक्षित शिक्षक निवडले गेल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते.

६) वेळेचे नियोजन स्पष्ट
अर्जाची तारीख, परीक्षा तारीख यामुळे उमेदवारांना योग्य नियोजन करता येते.

७) गैरप्रकारांवर कडक कारवाई
पूर्वीच्या गैरप्रकारांमुळे दोषी उमेदवारांना बंदी घालून परीक्षेची विश्वासार्हता वाढवली आहे.

८) एकाच अर्जातून दोन्ही स्तरासाठी संधी
पेपर १ व पेपर २ साठी एकाच अर्जातून पर्याय निवडता येतो, त्यामुळे प्रक्रिया सोपी होते.

९) कागदपत्र पडताळणीची कडक अट
खोटी माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होण्याची तरतूद असल्यामुळे शिस्त राखली जाते.

१०) नियमित अपडेट्सची सुविधा
वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध असल्याने उमेदवार सतत अपडेट राहू शकतात.


शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत


राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना.


राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विस्तार बाबत


जिल्हा परिषदेच्या अधिनस्त मोडकळीस आलेल्या / धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारती निर्लेखनाबाबत मार्गदर्शक नवीन सूचना.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.