अतिप्रदान व अखर्चित (अर्थसंकल्पीत) निधीचा परतावा शासनास भरणा (जमा) करण्याबाबत
परिपत्रक दि ११ मे २०२६ नुसार शासनाने निर्देश दिले आहेत कि......
प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे आहरण व संवितरण अधिकारी उचित नियमांचे पालन करुन, कोषागारातून आवश्यकतेप्रमाणे निधी आहरित करुन अंतिम अदात्यांना प्रदान करतात. तथापि अनेक प्रकरणी प्रचलित नियमांप्रमाणे, अंतिम अदाते निश्चित नसताना, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना, निधी आहरित करुन प्रथम स्वत:च्या बँक खात्यामध्ये ठेवून तो खर्च करावा लागतो. कोषागारातुन आहरित केलेला निधी विहित मुदतीत खर्च न केल्यास तो शासनास परत करावा लागतो. कोषागारातून आहरित केलेल्या निधी संबंधात, काही प्रकरणी अतिरिक्त प्रदाने झालेली असतात, काही प्रकरणी निधी चुकीच्या कारणासाठी आहरित केलेला असतो, अथवा ज्या प्रयोजनासाठी निधी आहरित केलेला असतो त्या प्रयोजनावर तो खर्च करणे शक्य नसते, अशा सर्व प्रकरणी, कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयामधून आहरित केलेला निधी ज्या कार्यालय / संस्थांकडे विनावापर पडून आहे, त्यांना सदर निधी शासन खाती परत जमा करावा लागतो.
कोषागारातून आहरित केलेला निधी कोषागारात परत भरणा करणे ही अपवादात्मक बाब असल्याने, भरणा करणाऱ्या यंत्रणांकडून शासकीय रकमा भरणा करण्यासाठी वापरावयाच्या महाराष्ट्र कोषागार नियम नमुना क्र. ६ च्या चलन नमून्यामधील लेखांकन तपशिल भरताना अनेक चुका होतात. वास्तविकता या रकमा कोषागारातून आहरित करताना खर्च म्हणून नोंदविलेल्या असल्याने, या परत भरणा करताना “वजा खर्च " म्हणून नोंदविणे आवश्यक असताना, अनेक प्रकरणी त्या चुकीच्या जमाशिर्षाखाली भरल्या जातात. भरणा करणाऱ्या कार्यालय / संस्था यांनी, सदरच्या चलनांवर "वजा खर्च" दर्शविण्यासाठी योग्य खर्च लेखाशिर्ष नमूद केले तरी कोषागार लेख्यामध्ये “वजा खर्च” दर्शविण्याची कार्यपद्धती नसल्याने, कोषागारे अशा रकमा चुकीच्या लेखाशिर्षाखाली नोंदवितात.
या विषयी संदर्भ क्र. १ अन्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत. मात्र संदर्भ क्र. १ मधील कार्यपद्धती कोषागारांना लागू नसल्याने संदर्भ क्र. २ अन्वये उक्त सूचना कोषागारासंदर्भात निरसित केलेल्या आहेत तसेच संदर्भ क्र.२ अन्वये कोषागारासंदर्भात पूर्वीचीच कार्यपद्धती अनुसरावी, असे नमूद केलेले आहे, महालेखापाल कार्यालयाने SNA संदर्भातील अखर्चित रकमा भरणा करण्यासंदर्भात शासनाने सूचनानिर्गमित कराव्यात असे कळविले आहे. या शिवाय संदर्भ क्र. ३ अन्वये कार्यान्वित झालेल्या आभासी वैयक्तिक ठेव लेखा (VPDA) प्रणालीमध्येही विहीत मुदतीनंतर रकमा शासनखाती परत करण्याचे निर्देश आहेत.
अखर्चित / अतिप्रदान वसुलीच्या रकमा या पूर्वी कोषागारातून आहरित करताना खर्च म्हणून नोंदविलेल्या असतात. अशा रकमांचा भरणा झाल्यानंतर त्यांचे लेखांकन "बजा खर्च" म्हणून होणे आवश्यक ठरते. अधिदान व लेखा कार्यालयाच्या लेख्यामध्ये "बजा खर्च" नोंदविण्याची सुविधा असल्याने त्यांचे लेखांकनास तत्वत: अडचणी नाहीत. कोषागारामध्ये "बजा खर्च" नोंदविण्याची सुविधाच नसल्याने, अशा रकमांचे कोषागारात जमा लेखाशिर्षामध्ये तात्पुरते लेखांकन केले जाते. महालेखापाल कार्यालय स्तरावर हस्तातरण नोंदवही (T.E) द्वारे सदर जमा रकमांचे अंतिम लेखाकन संबंधित खर्चाच्या लेखाशिर्षाखाली “वजा खर्च" स्वरुपात केले जाते. तथापि कार्यपद्धतीच्या विस्तृत माहितीअभावी या विषयीची चलने कोषागारातून महालेखापाल कार्यालयास सादर केले जात नाहीत. परिणामी, महालेखापाल कार्यालयास संबंधित चलने “वजा खर्चाची” असल्याची माहितीच मिळत नसल्याने, त्यांचे चुकीच्या जमा लेखाशिर्षाखाली लेखांकन केले जाते.
उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन अखर्चित / अतिप्रदानाच्या वसुलीच्या रकमा शासन खाती भरण्यासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
(अ) अधिदान व लेखा कार्यालयात जमा करावयाच्या अखर्चित / अतिप्रदानाच्या वसुलीच्या रकमा -
अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आहरण व संवितरण अधिकारी / अन्य शासकीय यंत्रणांना, त्यांच्याकडील अखर्चित रकमा, त्यांच्याकडून अतिप्रदान झालेल्या रकमांच्या वसूली, यांचा भरणा भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये महाराष्ट्र कोषागार नियम नमुना क्र. ६ मध्ये करावा लागतो. अधिदान व लेखा कार्यालयाने "वजा खर्चाचे" लेखांकन करण्यासाठी जमा/ खर्चाच्या प्रत्येक मुख्य लेखाशिर्षासाठी "RBI मध्ये स्वतंत्र खाते क्रमांक" सुरू केलेला आहे. या विषयीची सद्यस्थितीमधील यादी “परिशिष्ट अ" म्हणून सोबत जोडण्यात येत आहे.
मागील आर्थिक वर्षासंबंधीच्या अखर्चित वसुलीच्या रकमा शासन खाती जमा करू इच्छिणाऱ्या कार्यालयांनी, भरणा करावयाची रक्कम, ज्या खर्च लेखाशिर्षा मधून आहरित केली, त्या खर्च लेखाशिर्षासंबंधित परिशिष्ट अ" मध्ये नमूद "RBI खाते क्रमांक" चलनाच्या शिरोभागी लाल शाईने स्पष्ट लिहावा. जर शासन खाती जमा करावयाची अखर्चित रक्कम मागील आर्थिक वर्षासंदर्भातील असेल, तर चलनाच्या शिरोभागी (RBI खाते क्रमांक खाली) गौण शिर्ष ९१२ अखर्चित रकमांचा भरणा" हा तपशिल नमूद करावा. चलनामधील मध्य स्तंभात (भागात) “लेखाशिर्ष तपशिल" मध्ये भरणा करावयाच्या रकमा ज्या खर्च लेखाशिर्षामधून आहरित केल्या, त्याचे पंचस्तरीय लेखावर्गीकरणचा तपशिल नमूद करावा. हा तपशिल मुळ खर्च देयकाच्या प्रथम पृष्ठावर उपलब्ध असतो. चलनामध्ये उर्वरित माहिती प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे अचूकपणे भरावी.
जर अतिप्रदानाची वसुली मागील आर्थिक वर्षातील असेल, तर चलनाच्या शिरोभागी "RBI खाते क्रमांक" चलनाच्या शिरोभागी लाल शाईने स्पष्ट लिहावा. त्याखाली चलनाच्या शिरोभागीच गौण शिर्ष *९११ - अतिप्रदानाची वसुलीच्या रकमा" हा तपशिल नमूद करावा. चलनामधील मध्य स्तंभात ( भागात) “लेखाशिर्षं तपशिल” मध्ये भरणा करावयाच्या रकमा ज्या लेखाशिर्षामधून आहरित केल्या, त्याचा पंचस्तरीय
लेखाशिषं वर्गीकरणचा तपशिल नमूद करावा. अतिप्रदानाची वसुली मागील आर्थिक वर्षासंदर्भातील रकमांचा भरणा करताना अशा प्रकरणी अधिदान व लेखा कार्यालयामार्फत त्यांचे लेखांकन ९११ - अतिप्रदानाची वसुली या गौणशिर्षाखाली संबंधित खर्च लेखाशिर्षांतर्गत केले जाते.
जर भरणा रक्कम चालू वर्षामध्ये आहरित केलेली असेल तर वर वर्णन केल्याप्रमाणे चलनामध्ये "RBI खाते क्रमांक" व लेखा विषयक तपशिल नोंदवावा. मात्र चालू आर्थिक वर्षामध्ये आहरित केलेल्या अखर्चित/अतिप्रदान वसुली संदर्भातील भरणा असेल तर शिरोभागी गौणशीर्ष ९११, ९१२ विषयक तपशील नमूद करू नये.) अधिदान व लेखा कार्यालयात, चालू वर्षाच्या अखर्चित / अतिप्रदानाची वसुलीच्या जमा रकमा संबंधित लेखाशिर्षाखाली "वजा खर्च" म्हणून नोंदविल्या जातात. परिणामी, संबंधित लेखाशिर्षाचा चालू वर्षाचा एकूण क्रमवधीत खर्च कमी होतो.
मागील अर्थिक वर्षांमधील अखर्चित / अतिप्रदानाची वसुलीच्या जमा रकमा मात्र ९१२ अखर्चित रकमा / ९११- अतिप्रदानाची वसुलीच्या जमा रकमा या गौण शिर्षाखाली स्वतंत्रपणे दर्शवल्या जातात. त्यांचा चालू आर्थिक वर्षांच्या संबंधित लेखाशिर्षाच्या क्रमवर्धीत खर्चावर परिणाम होत नाही.
ब) कोषागार कार्यक्षेत्रामध्ये भरणा
मागील वर्षासंबंधीच्या अखर्चित रकमांचा भरणा करु इच्छिणाऱ्या कार्यालय / संस्था यांनी, त्यासाठी महाराष्ट्र कोषागार नियम नमुना क्र.६ या चलन नमुन्याचा वापर करावा. भरणा करावयाची अखर्चित रक्कम मागील आर्थिक वर्षामध्ये आहरित केलेली असल्यास "गीण शीर्ष ९१२ अखर्चित रकमांचा भरणा हा तपशील चलनाच्या शिरोभागी लाल शाईने लिहावा. चलनाच्या शिरोभागीच गौणशीर्ष तपशिलाखाली लाल शाईने अखर्चित रकमा ज्या खर्च लेखाशिर्षामधून आहरीत केल्या त्या खर्च लेखाशिर्षाचे पंचस्तरीय वर्गीकरण CRC कोड अचूकपणे लिहावा. चलनाच्या मध्य स्तंभामध्ये ( भागामध्ये) 'लेखाशीर्ष तपशील" या भागात ००७० इतर प्रशासनिक सेवा, ६० इतर सेवा, ८०० इतर जमा, (०१) (१६) संगणक संकेतांक "००७००७६२०१" संकीर्ण, हा तपशील कोषागार लेखांकनासाठी नमूद करावा.
भरणा करावयाची रक्कम मागील आर्थिक वर्षामध्ये आहरित केलेली, अतिप्रदान वसुलीची रक्कम असल्यास, अतिप्रदान वसुलीच्या रकमा शासन खाती जमा करु इच्छिणाऱ्या कार्यालयांनी चलनाच्या शिरोभागी गौण शीर्ष ९११ अतिप्रदानाची वसूलीच्या रकमा" हा तपशील नोंदवावा. चलनाच्या शिरोभागीच गौणशीर्ष तपशिलाखाली लाल शाईने अखर्चित रकमा ज्या खर्च लेखाशिर्षामधून आहरीत केल्या त्या खर्च लेखाशिषंचे पंचस्तरीय वर्गीकरण व CRC कोड अचूकपणे लिहावा. चलनामधील मध्य स्तंभात (भागात) "लेखाशिषं तपशिल" याभागात ००७० इतर प्रशासनिक सेवा, ६० इतर सेवा, ८००- इतर जमा, (०१) (१६) - संगणक संकेतांक "००७००७६२०१* संकीर्ण हा तपशील कोषागार लेखंकनासाठी नमूद करावा.
शासन खाती जमा करावयाच्या रकमा चालू आर्थिक वर्षामध्ये आहरित केलेल्या अखर्चित अतिप्रदान वसुली संदर्भात असल्यास, चलनाच्या शिरोभागी लाल शाईने अखर्चित रकमा ज्या खर्च लेखाशिर्षामधून आहरीत केल्या त्या खर्च लेखाशिर्षांचे पंचस्तरीय वर्गीकरण व CRC कोड अचूकपणे लिहावा. (चालू आर्थिक वर्षामध्ये आहरित केलेल्या अखर्चीत / अतिप्रदान वसुली संदर्भातील भरणा असेल तर शिरोभागी गौणशीर्ष ९११, ९१२, विषयक तपशील नमूद करू नये.
टिप :- वरील कार्यपद्धतीमध्ये विशिष्ट शब्दयोजना लाल शाईने नोंदविण्याविषयी सूचना आहेत. एखादे कार्यालय उक्त विषयी संगणकीय चलन वापरणार असेल तर त्यांनी उक्त तपशिल " Bold" स्वरूपात मुद्रित करुन त्याखाली लाल शाईने अधोरेखित करावे.
क) कोषागाराने लेखांकन करताना घ्यावयाची दक्षता:-
कोषागाराने वरील तीनही प्रकरणी (अखर्चीत / अतिप्रदान वसुली बाबतीत) कोषागार मध्ये लेखांकन करताना चलनामधील लेखांकन तपशील या भागामध्ये दर्शवलेल्या या संगणक संकेतांक "००७००७६२०१ संकीर्ण, खाली करावे.
सर्वसाधारणपणे कार्यपद्धती म्हणून जमेचे लेखांकन कोषागार स्तरावर केले जाते व तत्संबंधी चलने महालेखापाल कार्यालयास सादर केली जात नाहीत. तथापि अखर्चीत / अतिप्रदान वसुलीच्या जमा यांचे "वजा खर्च" म्हणून लेखांकन महालेखापाल कार्यालयाकडून होणार असल्याने अखर्चित/अतिप्रदान वसुली साठी कोषागारामध्ये तात्पुरत्या स्वरुपात लेखांकन करण्यासाठी निश्चित केलेल्या संगणक संकेतांक *००७००७६२०१* संकीर्ण संबंधातील सर्व चलने व त्यासंबंधीची स्वतंत्र जमासूची (Receipt schedule) महालेखापाल कार्यालयास सादर करावी. प्रत्येक महिन्यामध्ये "बजा खर्चाची" कोषागाराने लेखांकित केलेली सर्व चलने महालेखापाल कार्यालयास सादर केली जात आहेत याची खात्री करून कोषागार अधिकारी यांनी मासिक लेख्यावर स्वाक्षरी करावी. संगणक संकेतांक ००७००७६२०१" संकीर्ण संदर्भातील एखादे चलन अप्राप्त असल्याची सूचना महालेखापाल कार्यालयाकडून आल्यास तद्संबंधिचे दुय्यम चलन / महालेखापाल कार्यालयास आवश्यक असणारा लेखांकन विषयक तपशिल त्वरीत महालेखापाल कार्यालयास सादर करावा.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .