भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत....
शासन निर्णय दि १० ऑक्टोबर २०२४ नुसार....
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे, ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४- २५ " घर घर संविधान" साजरा करण्याचा उद्देश खालीलप्रमाणे आहे:-
१. संविधानाची जागरूकता:-
संविधानाचे महत्व, त्यातील मूल्ये आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे.
२. शिक्षण:-
संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, आणि विविध तरतुदींचे शिक्षण देणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे.
३. मूल्यसंस्कार:-
भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल.
४. सक्रिय सहभाग:-
विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदा-यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे.
५. राष्ट्रीय एकात्मता:-
व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था व महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर
३. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता निर्माण व्हावी. तसेच भारतीय संविधानाच्या मुलभुत तत्वांची माहिती समाजातील उपेक्षित घटकास व्हावी यासाठी सदर कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करुन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन व सल्ला देण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे राज्यस्तरीय घर घर संविधान समिती स्थापन करण्यात येत आहे.
• जिल्हास्तरीय समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या घर घर संविधान या कार्यक्रमांची अंमलबजावणी, देखरेख व संनियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यातील इतर आवश्यक अधिकारी यांचा समितीमधील सदस्य प्रतिनिधी म्हणून समावेश संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर करावा.
जिल्हास्तरीय समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-
संविधान मंचाच्या कार्याची वार्षिक योजना तयार करणे, ज्यामध्ये विविध उपक्रम, कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करणे. संविधान दिन (२६ नोव्हेंबर) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) यासारख्या महत्वाच्या तारखावर तसेच महिनावार वेळापत्रक आखून विशेष कार्यक्रम आयोजित करणे. सदर समितीने उपरोक्त मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त आपल्या स्तरावरून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून अधिक चांगल्या रीतीने कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ घर घर संविधान" हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर, २०२४ पासून साजरा करावा.
संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम दि. २६ नोव्हेंबर, २०२४ पासून पुढील प्रत्येक वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून अंमलबजावणी करावी. तसेच संबंधित जिल्ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची खात्री व सनियंत्रण संबंधित विभागीय आयुक्त यांनी करावे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुल्यमापन करून त्याबाबतची नोंद संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त, यांच्या वार्षिक मुल्यांकन अहवालात घेण्यात यावी.
महत्व / फायदे
नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढते.
विद्यार्थ्यांना मूलभूत हक्क व कर्तव्यांची माहिती मिळते.
समाजात लोकशाही, समता व बंधुता यांचे मूल्य वाढते.
राष्ट्रीय एकात्मता बळकट होते.
उपेक्षित घटकांमध्ये अधिकारांची जाणीव निर्माण होते.
विद्यार्थ्यांचा सामाजिक व नागरिक सहभाग वाढतो.
दि. १० ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार, राज्यातील शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, आश्रमशाळा तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था आणि विधानमंडळ स्तरावर “संविधान अमृत महोत्सव २०२४–२५ – घर घर संविधान” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये, भारतीय संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांना त्यांच्या घटनात्मक अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देणे हा आहे.
यामध्ये संविधानाचे महत्व, मूलभूत हक्क व कर्तव्ये, लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय व राष्ट्रीय एकात्मता यांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांच्यात जबाबदारीची भावना विकसित करण्यावर भर दिला जाईल.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती (मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली) तसेच जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात येतील, ज्या कार्यक्रमाचे नियोजन, देखरेख व मार्गदर्शन करतील.


मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .