महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2025. सन 2025-2026 चे अनुदान वितरण
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2025. सन 2025-2026 GR Date 6 March 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने निर्देश देवून अनुदान वितरण केले असून आपण खाली सविस्तर पाहू शकता....
२. सन २०२५ २०२६ या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला उपरोक्त निधी / अनुदान खालील अटी व शर्तींच्या अधिन राहून वितरीत करण्यात येत आहे :-
(१) वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / शासन परिपत्रक यामधील विहित सूचना / अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम, १९५९ मधील परिशिष्ट-२६ मधील तरतूदी विचारात घेवून, संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्यात यावा. यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी.
२) दिनांक ०१.०५.२००१ रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास (दुसऱ्या वेळेस जुळया अपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही.
३) ज्या उद्देशासाठी निधी / अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. तसेच इतर लेखाशिर्षाकडे वळती करता येणार नाही.
४) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास १० तारखेपर्यंत सादर करावा.
५) निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग- पहिला वित्त विभाग, शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र. ३० / २०१३ / विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग-२ मधील अटी व शर्तीचे पालन करुन सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेवून अनुदान अदा करावे.
६) पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती / मंत्रीमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी.
७) खाजगी स्वंयसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करुन देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग-१, उपविभाग एक मधील अनुक्रमांक २७, नियम १४९ प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेवून अनुदान अदा करावे.
८) ज्या तरतूदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतूदी वितरीत करताना भाग-१, उपविभाग तीन, अनुक्रमांक चार नियम २७ (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरीत करावे.
नये.
९) जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेत्तर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरीत करु
१०) नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावाव्दारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.
११) विविध शासकीय/ प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहायक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांचेकडून पूर्वी वितरीत केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत. यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरीत करण्यात येऊ नये. कोषागार अधिकाऱ्यांनी, सहायक अनुदानामधून निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाऊंट स्टेटमेंट (Bank Account Statement) ची प्रत जोडलेली नसल्यास देयक पारित करु नये.
१२) शासनाव्दारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ECS व्दारे प्रदान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरीत्या व Offline पध्दतीने वितरीत करण्यात येऊ नये.
१३) स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमांचा आढावा घेण्यात यावा व त्या रकमा वसूल करूनच उर्वरीत अनुदान वितरीत करण्यात यावे. तसेच शासनाव्दारे सदर संस्थांना वितरीत केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे. याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी. सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्याचे बँक अकाऊंट स्टेटमेंट (Bank Account Statement) शासनास सादर करावे. एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरीत करु नये.
(१४) वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कार्यक्रमाअंतर्गतची लाभार्थ्यांची देयके आहरित करतांना लाभार्थ्यांची यादी निश्चित करुन योग्य त्या तपशिलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्यांची अनुदाने आहरित करण्यात येऊ नयेत. वैयक्तिक लाभार्थ्यांचे कार्यक्रम आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात यावे व अनुदानाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमनेच (ECS) व्दारेच करण्यात यावे. तसेच, वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांसदर्भात वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२७/ अर्थबळ, दिनांक ०८ जून २०२२ व दिनांक ०४ मार्च २०२४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली असल्याबाबत संबंधित विभागांनी खातरजमा करावी.
१५) शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती, वैयक्तिक लाभार्थी तसेच सवलती पोटी दिलेले अनुदान इत्यादींची प्रदाने, इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीम (ECS) व्दारेच करण्यात यावे. अशा बाबी आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात याव्यात.
१६) बांधकाम विषयक प्रस्तावासंदर्भात प्रशासकीय मान्यता / तांत्रिक मान्यता तसेच आवश्यक तेथे सचिव समितीची मान्यता प्राप्त करून कामनिहाय निधी अर्थसंकल्पीत करणे आवश्यक आहे. नवीन कार्माबाबत निधीच्या उपलब्धतेची खात्री केल्यांनतरच कामाची निविदा सूचना काढून कार्यारंभ आदेश देण्यात येवून काम सुरु करावे व आवश्यकतेप्रमाणे निधीचे वितरण करण्यात यावे. जुन्या कार्माचा आढावा घेऊन ती प्राथम्याने पूर्ण करण्यात यावीत व हा निधी ठेव बांधकामाचे स्वरुपात सार्वजनिक बांधकाम विभागास प्रदान करु नये.
१७) केंद्र पुरस्कृत योजनांबात केंद्र शासनाने वितरीत केलला निधी राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा झाल्याची खात्री करण्याबाबत वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण- १०१८/प्र.क्र.४६/अर्थोपाय, दिनांक ५ डिसेंबर, २०२३ मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. यासाठी नस्ती पुन्हा वित्त विभागास सहमतीसाठी वेगळयाने संदर्भीत करण्याची आवश्यकता नाही. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा निधी एकूण अर्थसंकल्पीय तरतूदीच्या १०० टक्केच्या मर्यादेत बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे. मागील वर्षामधील केंद्र शासनाचा निधी चालू वर्षी खर्च करावयाचा असल्यास त्यास आवश्यकतेप्रमाणे यथास्थिती नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग तसेच वित्त विभागाची सहमती घेणे अनिवार्य राहील. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ज्या विभागाचे SNA खाते सुरु आहे त्या विभागाने सदर निधी विहीत मुदतीत SNA खात्यात वर्ग करण्याबाबत दक्षता घ्यावी.
(१८) शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका", उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांच्या क्र. भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-III/ उद्योग-४, दि. १ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रसिध्द केली आहे. सदर शासन निर्णय व त्यासोबतच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तसेच, सदर विभागाने तद्नंतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / परिपत्रक यामधील सूचनांनुसार व तरतुदींनुसार खरेदी प्रक्रीया पूर्ण करुन पुरवठादार निश्चित झाल्यानंतर या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचना / अटींचे पालन करुन खरेदीची देयके कोषागारातून आहरित करण्यात यावीत. खरेदी विषयक धनादेश संबंधित पुरवठादाराच्या नावाने व इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमव्दारे (ECS) अदा करण्यात यावेत.
(१९) अनेक वेळेला विभागांव्दारे संक्षिप्त देयकाव्दारे निधी खर्च करण्यात येतो. मात्र त्याचे तपशीलवार देयक सादर न केल्यामुळे लेखा आक्षेप येतात व अपहार संभवतात. तरी यापुढे विभागांनी ज्या लेखाशीर्षाखाली जुनी तपशीलवार देयके प्रलंबित असतील ती सादर केल्याशिवाय त्या लेखाशिर्षाखालील निधी वित्त विभागाच्या सहमतीशिवाय आहरित करु नये.
२०) विविध कारणांमुळे अखर्चित राहिलेला निधी विभागांनी त्यांच्या अधिनस्त महामंडळाकडे हस्तांतरीत करुन तांत्रिकदृष्टया खर्च झाल्याचे दाखविले जाते, ही एक प्रकारची अनियमितता आहे, याची विभागांनी नोंद घ्यावी. तसेच त्यांच्या अधिनस्त असलेला यापूर्वीचा अखर्चित निधी (स्वीय प्रपंजी खात्यातील / महामंडळाच्या खात्यातील वा इतर प्रकारे खर्च दर्शवून बाहेर ठेवण्यात आलेला) संपूर्णतः खर्च झाल्याशिवाय तरतुदी आहरीत वा वितरीत करु नयेत. याठिकाणी असेही निदर्शनास आणण्यात येते की, स्वीय प्रपंजी लेख्याखाली विभागांकडे बऱ्याच मोठया प्रमाणावर निधी अखर्चित असल्याचे दिसून येते. सदर निधीचा ताळमेळ घालून व लेखा परिक्षण करून निधी विहीत मुदतीत खर्च न झाल्यास तो शासनाच्या तिजोरीत परत करण्यात यावा. सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्याचे बँक अकाऊंट स्टेटमेंट (Bank Account Statement) शासनास सादर करावे.
२१) थकित देयकांच्या प्रदानासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रकरणी खरेदी केलेले साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्याचे लेखे सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय तो निधी आहरित करण्यात येऊ नये.
२२) संदर्भाधिन क्रमांक १ येथील वित्त विभागाचे शासन परिपत्रक दिनांक ७ एप्रिल २०२५ मध्ये नमूद सर्व अटी व शर्ती बरोबरच खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली, वित्तीय नियमावली, अर्थसंकल्पीय नियम पुस्तिकेतील तरतूदी व सर्व अटी / शर्तीचे पालन करणे आवश्यक राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका नियम १७ व नियम १४२, तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला मधील उपविभाग एक नियम क्र. १४९ आणि वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दिनांक ०७ एप्रिल २०२५, दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२५ व दिनांक २९ जानेवारी, २०२६, अनुक्रमांक १ करिता वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. १६४/व्यय-५, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६ व अनुक्रमांक २ करिता वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ११७/ व्यय-५, दिनांक १६ फेब्रुवारी, २०२६ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
सन २०२५–२६ या आर्थिक वर्षातील निधी / अनुदान वितरणाबाबत अटी व शर्ती
सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स (BEAMS) प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी / अनुदान खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून वितरित करण्यात येणार आहे.
-
शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करताना वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय, परिपत्रके तसेच मुंबई वित्तीय अधिनियम १९५९ मधील परिशिष्ट–२६ मधील तरतुदींचा विचार करूनच घरबांधणी अग्रिम मंजूर करावा. संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी किमान मर्यादेतीलच रक्कम देण्यात येईल याची दक्षता घ्यावी.
-
१ मे २००१ रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या अर्जदारास (दुसऱ्या वेळी जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ मिळणार नाही.
-
मंजूर केलेला निधी / अनुदान ज्या उद्देशासाठी मंजूर आहे त्याच उद्देशासाठी खर्च करावा. तो इतर कोणत्याही उद्देशासाठी किंवा अन्य लेखाशिर्षाकडे वळवता येणार नाही.
-
खर्चाचा मासिक प्रगती अहवाल नियंत्रक अधिकाऱ्यांनी मासिक निधी विवरणपत्रानुसार दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत शासनास सादर करावा.
-
निधी वितरित करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यांतील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊनच अनुदान अदा करावे.
-
पदनिर्मितीशी संबंधित वेतनासाठी निधी वाटप करताना आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय सचिव समिती किंवा मंत्रिमंडळाची मान्यता घेतलेली आहे याची खात्री करावी.
-
खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील नियम १४९ नुसार सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.
-
ज्या बाबींमध्ये प्रशासकीय मान्यता आदेश आवश्यक आहे, अशा बाबींमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्यानंतरच अनुदान वितरित करावे.
-
जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेत्तर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्यानंतरच वितरित करावे.
-
नवीन खर्चासाठी प्रस्तावित निधी वितरित करताना वित्त विभाग तसेच आवश्यकतेनुसार नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.
-
विविध शासकीय / प्रशासकीय संस्थांना किंवा अनुदानित संस्थांना अनुदान देण्यापूर्वी त्यांनी पूर्वी मिळालेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे (Utilization Certificate) सादर केलेली असणे आवश्यक आहे. तसेच मागील महिन्याचे बँक खाते विवरण (Bank Account Statement) जोडलेले नसल्यास देयक मंजूर करता येणार नाही.
-
शासनाकडून देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ECS द्वारे देणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत ही रक्कम एकत्रित किंवा ऑफलाईन पद्धतीने वितरित करता येणार नाही.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विस्तार बाबत

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .