केंद्र शासन पुरस्कृत “युवा आपदा मित्र योजना" राज्यात राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत...
शासन निर्णय दि 11 फेब्रुवारी २०२६ नुसार महाराष्ट्र शासनाने निर्देश दिले आहेत कि .....
प्रस्तावना -
स्थानिक रहिवासी हा कोणत्याही आपत्ती दरम्यान “प्रथम प्रतिसाद कर्ता” असतो. यास्तव स्थानिक स्तरावर आपत्तीला तातडीने प्रतिसाद देण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देऊन स्थानिकांना सक्षम करणे या उद्देशाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), नवी दिल्ली यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात "Up Scaling Aapada Mitra" ही योजना राबवण्यात आली होती. या योजनेत राज्यातील बहुआपत्तीग्रस्त २० जिल्ह्यांमध्ये एकूण ७९०० आपदा मित्र प्रशिक्षित करण्यात आले आहेत.
संपूर्ण देशात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर योजनेचे फायदे लक्षात घेऊन NDMA, नवी दिल्ली यांच्यामार्फत १००% केंद्र शासन पुरस्कृत “युवा आपदा मित्र" या योजनेद्वारे आपदा मित्र योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये NDMA, नवी दिल्ली व राज्य शासन यांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे राज्यात “युवा आपदा मित्र योजना” राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय -
केंद्र शासन पुरस्कृत “युवा आपदा मित्र” योजना राबविण्याकरीता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), नवी दिल्ली व राज्य शासन यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्यातील बहुआपत्तीप्रवण २० जिल्ह्यांमध्ये सदर योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अ) योजनेचे प्रारूप व कार्यपद्धती :-
राज्यात यापूर्वी राबविण्यात आलेल्या "Up Scaling Aapada Mitra" या योजनेत समाविष्ट असणाऱ्या व खालील तक्त्यात नमूद २० बहुआपत्तीप्रवण जिल्ह्यांमध्ये “युवा आपदा मित्र” योजना (YAMS) राबविण्यात येत आहे.
ब) या योजनेंतर्गत २० जिल्ह्यातील राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), मेरा युवा भारत (MY Bharat) आणि भारत स्काऊट ॲन्ड गाईड (BS&G) या संस्थेतील १८ ते ४० वर्ष या वयोगटातील एकूण १९९३० स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन विषयक ७ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजनेतील २० जिल्ह्यांची नावे व उपरोक्त ४ संस्थामधील जिल्हानिहाय प्रशिक्षणार्थी यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
क) राज्यात अधिकाधिक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे या उद्देशाने युवा आपदा मित्र योजने अंतर्गत “मास्टर ट्रेनर” तयार करण्यात येणार आहे. राज्यात यापूर्वी राबविण्यात आलेल्या “अपस्केलिंग आपदा मित्र" या योजनेतील १०० आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत २१ दिवसांचे प्रगत निवासी प्रशिक्षण देऊन त्यांना “मास्टर ट्रेनर" म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. सदर मास्टर ट्रेनर या योजनेमधील स्वयंसेवकांना प्रशिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक सहाय्य करतील.
ड) या योजनेअंतर्गत प्रत्येक आपदा मित्राला प्रत्येकी एक याप्रमाणे आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ER kit), प्रशिक्षण साहित्य, ओळखपत्र, प्रशस्तीपत्रक व ३ वर्षाकरीता विमा सुरक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वित्तीय तरतूद :- सदर योजना १००% केंद्र पुरस्कृत असून युवा आपदा मित्र योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीकरीता स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत NDMA, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनेनुसार राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते उघडण्यात आले आहे. याकरीता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून राज्यास रू.३७.७० कोटी एवढा निधी ३ टप्प्यात (१०%, ५०% व ४०% ) वितरित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच याकरीता रू.८.७६ कोटी निधी ८०, सर्वसाधारण, ००१, संचालन व प्रशासन, (०१) महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, (०१) (०१) महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे कार्यालय स्थापन करणे तसेच फर्निचर व साधनसामुग्रीसह सुसज्जीकरण करणे (कार्यक्रम), २२४५ १७६१ या लेखाशिर्षामधून करण्यात येणार आहे. याबाबतचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. :-
४.योजनेची अंमलबजावणी :-
अ) राष्ट्रीय छात्र सेना (NCC) :- योजनेतील चार संस्थापैकी NCC यांच्या ७९०० स्वयंसेवकांच्या निवासी प्रशिक्षणाकरीता आवश्यक प्रशिक्षण, सभागृह, निवास, भोजन व्यवस्था तसेच इतर अनुषंगिक सोयी सुविधा NCC मार्फत उपलब्ध करून देण्यात येतील.
संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) यांच्याद्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक तज्ञ प्रशिक्षक व इतर तांत्रिक सहाय्य पुरविण्यात येईल. उपरोक्त प्रशिक्षणाच्या खर्चाकरीता मंजूर निधी आवश्यकतेप्रमाणे NCC तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना टप्प्या- टप्प्याने वितरित करण्यात येईल.
ब) राष्ट्रीय सेवा योजना (NSS), मेरा युवा भारत (MY Bharat) आणि भारत स्काऊट ॲन्ड गाईड (BS&G) :- NSS, MY Bharat व BS&G यांच्या अनुक्रमे ३९५०, ४००० व ४०८० अशा एकूण १२०३० स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात येईल. या विविध संस्थांचे प्रशिक्षणार्थी यांच्या प्रशिक्षणात एकसुत्रता राहण्याकरीता राज्य स्तरावरून खुली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येईल.
५. व्यवस्थापन व अंमलबजावणी यंत्रणा :-
योजनेच्या व्यवस्थापनेकरीता आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई यांना “प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा " तसेच जिल्हास्तरावर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता संबंधित जिल्ह्याच्या “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA)” यांना “प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा " म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.
राज्य शासन, जिल्हा प्रशासन व योजेनतील सर्व संस्था यामधील योग्य समन्वयासाठी “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO)” यांची जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
योजनेंतर्गत प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी, योजनेबाबतचे अहवाल, खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र, अंतिम अहवाल व वेळोवेळी आवश्यक माहिती शासनास सादर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची असेल.
६. सदर शासन निर्णय सं.क्र. १ व २ अन्वये करण्यात आलेल्या सामंजस्य करार व मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच नियोजन विभागाच्या ई- नस्ती क्र. ११७७५२३ व वित्त विभागाच्या दि. ५ जानेवारी, २०२६ अन्वये प्राप्त मान्यता व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांत वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीत अनुसरावयाच्या कार्यपध्दीतीबाबत.
एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत......
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विस्तार बाबत

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .